आमच्याबद्दल

पशुसंवर्धन कर्मचारी सहकारी पतपुरवठा संस्था मर्यादित, नागपूर द्वारे आपली स्वप्ने समजून घेतो पशुसंवर्धन कर्मचारी सहकारी पतपुरवठा संस्था मर्यादित, पशुवैद्यकीय परिसर, महाराजबाग समोर, नागपूर १२ ची स्थापना नोदणी क्र.एन.जी.पी./बी.एन.के./२०१ दि.३१-७-१९७२ ला करण्यात आली असून फार कमी सभासद व कमीतकमी भागभांडवलावर सुरुवात करण्यात आली. मा. अद्यक्ष व सचिव तसेच संस्थेचे सर्व संचालक व अधिकारी व कर्मचारी त्यांच्या सततच्या परिश्रमांमुळे संस्था वर्तमान स्थितीत स्वबळावर उभी आहे. आज आपल्या संस्थेला ४४ वर्ष पूर्ण झाले आहे.
पतसंस्थेचे सन्मानीय सभासद बंधु भगिनिंनो यास सप्रेम नमस्कार. आज आपल्या संस्थेचा सन २०१८ -१९ चा ५० वा वार्षिक अहवाल सादर करतांना अत्यानंद होत आहे. आपणास सादर केलेल्या वार्षिक हिशोब पत्रकावरून निश्चितच लक्षात येईल कि, आपली संस्था दिवसेंदिवस प्रगती पथावर आहे. सर्वप्रथम संस्थेच्या वतीने मा. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त नागपूर विभाग, नागपूर तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी ज्यांनी संस्थेची वसुली बाबत, तसेच इतर महत्वाची कामे करण्यात संस्थेस मदत केली. मा.जिल्हा पशुसंवर्धन उपआआयुक्त/मा.जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया यांच्या सद्दभावाना ह्या संस्थेला नेहमीच प्रेनादायी ठरलेल्या आहे. नागपूर विभागातील तसेच खात्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी व त्यांचे लिपिक वर्गीय सहकारी यांनी संस्थेच्या मागणीनुसार सभासदांच्या वेतनातून कपात करून संस्थेला धनादेशाव्दरे रक्कम देतात, त्यांचे मनपूर्वक आभारी आहे. परंतु काही कार्यालयामार्फत संस्थेच्या मागणीनुसार कार्यवाही न करता परस्पर रक्कम कमी करून धनादेश संस्थेस पाठवितात ही बाब सयुक्तीक नाही. त्यामुळे सभासदांवर कर्जाचा बोझा वाढतच जात आहे. त्यामुळे जर सभासद मागणीपेक्षा कमी रक्कम कपात करण्यास सभासद सांगत असल्यास त्यांना संस्थेकडून लेखी पत्राची मागणी करावी. व पत्र प्राप्त झाल्यानंतर पत्रात नमूद केलेली रक्कम कपात करावी, हि विनंती.

    Ah Society nagpur
Ah Society nagpur
सहकार क्षेत्रात मा.जिल्हा निबंधक सहकारी संस्था, नागपूर शहर व त्यांचे सहकारी, मा.नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नागपूर, शिक्षक सहकारी बँक, नागपूर व इतर सर्व बँका ज्या या संस्थेशी निगडीत आहेत, न्यू इंडिया इन्शोरेंस कंपनी, धरमपेठ शाखा, नागपूर यांनी सभासदांच्या अपघाती विमा योजनेत लाभ प्रदानाबाबत वेळोवेळी सहकार्य दिले. वरील सहकार्याबद्दल संस्था आपले ऋणी असून मनपूर्वक आभारी आहे.

संस्थेचे लेखा परीक्षक श्री.व्ही.के.गुंजकर प्रमाणित लेखापरीक्षक, सहकारी संस्था, नागपूर यांनी संस्थेचे लेखापरीक्षक करून लेखापरीक्षक अहवाल वेळेच्या आंत दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

संस्थेचे सर्व सभासद अधिकारी/कर्मचारी वर्ग, मित्रमंडळी व ज्यांनी संचालक मंडळास संस्था चालविण्याकरिता प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्वरुपात मदत केली, त्यांचे मनपूर्वक आभार व सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचे पुढील आयुष्य सुखी समाधानाने जावो, हिच सदिच्छा. उपस्थित सर्वांचे आभार मानून तसेच सहकार्याची अपेक्षा बाळगून संस्थेचा ५० वा अहवाल पूर्ण करतो.


सभासदांनकरिता विशेष सूचना

१.कर्ज प्रकरणे

    जे सभासद पतसंस्थेकडून नियमित कर्जाकरिता अर्ज करतात. परंतु अर्जात नमूद केल्याप्रमाणे ज्या कारणास्तव, कर्ज घेत आहे, त्याबाबतची संपूर्ण कागदपत्रे संस्थेत जमा करीत नाही. असे मागील प्रत्येक लेखा परीक्षणाच्या वेळी आढळून आले आहे. तेव्हा संस्थेच्या प्रगती दुर्ष्टीकोनातून वारंवार येत असलेला लेखा परीक्षणातील आक्षेप न येण्याच्या दुर्ष्टीने सर्व सभासदांनी ज्या कारणास्तव कर्जाची उचल केली आहे. त्याची कागदपत्रे संस्थेत जमा करावी. तसेच यापुढे कर्जाचा अर्ज सादर करतांना किंवा कर्जाची उचल करतांना कागदपत्रे संस्थेस जमा करणे अनिवार्य राहील. तत्कालीन कर्जाची उचल करतांना वेतनाचा तपशील संबधित आहरण व सवितरण अधिकारी याच्याकडून प्राप्त करून सादर करावा. आकस्मिक कर्ज उचल करतांना वेतन प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक राहील.

२.लाभांष.

    जे सभासद १२ महिन्यापेक्षा जास्त नियमित तसेच तत्कालीन कर्ज थकबाकीदार आहेत अशा सभासंदाची लाभांष पोटी मिळणारी रक्कम थकीत कर्ज व व्याजात वळती करण्यात येईल तसेच ३ वर्षात उचल नकरणा-या सभासंदाचा लाभांष राखीव निधीत वळती करण्यात येईल

३.सभासद

    सन्माननीय सभासद कृपया सभेस येतांना स्वताचे ओळखपत्र व वार्षिक अहवालाची प्रत व बँक पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, आधार कार्ड, पनकार्डची छायांकित प्रत सोबत आणावी

४. नवीन सभासद

    नवीन सभासद होण्याकरिता संस्थेच्या प्रवेश अर्जासह पासपोर्ट फोटो आधार कार्ड, पनकार्डची छायांकित प्रत सोबत जोडणे अनिवार्य आहे. अन्यथा प्रवेश अर्जाचा विचार केला जाणार नाही

५. भागभांडवल

    सन्माननीय सभासद ज्या आर्थिक वर्षात सेवानिवृत्त झाले त्यांनी ३१ मार्च पूर्ण झाल्यावर भागभांडवलाची रक्कम उचल करावी. उचल न केल्यास या भागभांडवलाच्या रक्कमेवर कोणत्याही प्रकारचे व्याज देय्य राहणार नाही तसेच भागभांडवलाची रक्कम ३ वर्षानंतर राखीव निधीत वळती करण्यात येईल.